T20I World Cup 2026: भारताचा सराव सामन्यात दमदार विजय; राधा-श्रेयंकाच्या गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजने टेकले गुडघे

India Defeat West Indies in Warm-up: भारतीय महिला संघ टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेपूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला.
India Women's Team

India Women's Team

Sakal

Updated on

India vs West Indies Warm-Up Match: वनडे वर्ल्ड कप गेल्यावर्षी मायदेशात जिंकल्यानंतर आता भारतीय महिला संघ (India Women's Team) टी२० वर्ल्ड कपही नावावर करण्यासाठी सज्ज झाला आहे. १२ जूनपासून महिला टी२० वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये होणार आहे.

स्पर्धेसाठी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. भारतीय संघाची तयारी खूप आधीच सुरू झाली असली, तरी आता सोमवारी सराव सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवत स्पर्धेसाठी संघ पूर्ण तयार असल्याचा इशारा दिला आहे.

India Women's Team
T20 World Cup: भारतीय महिला संघ विश्वकरंडकासाठी रवाना; 'या' दिवशी रंगणार भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, पहा संपूर्ण वेळापत्रक
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com