
India vs Ireland 2nd ODI: भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी (१२ जानेवारी) आयर्लंड महिला संघाविरुद्ध दुसऱ्या वनडेत ११६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात भारताची सांघिक कामगिरी महत्त्वाची ठरली. फलंदाजांसोबतच गोलंदाजांनीही त्यांची भूमिका चोख पार पाडली.
या सामन्यात भारताने आयर्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडला ५० षटकात ७ बाद २५४ धावाच करता आल्या.