
India Women vs West Indies Women 1st T20I: भारतीय महिला संघाने रविवारी वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध टी२० सामन्यात ४९ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय महिला संघाने ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे.
नवी मुंबईत झालेल्या या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजसमोर १९६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला ७ बाद १४६ धावाच करता आल्या. भारताच्या विजयात गोलंदाज तितास साधू, जेमिमाह रोड्रिग्स आणि स्मृती मानधना यांनी मोलाची भूमिका बजावली.