
Hardik Pandya Viral Video
ESakal
सुप्रसिद्ध क्रिकेटर हार्दिक पांड्या त्याच्या नात्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक यांच्या घटस्फोटानंतर क्रिकेटर हार्दिक पांड्या याने त्याच्या खासगी नात्याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. मात्र काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा यांचे नाते असल्याच्या अफवा पसरत आलेत. असे असतानाच माहिका शर्मा आणि हार्दिक पांड्या यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.