
भारतीय महिला आणि पुरुष संघ २०२५-२६ क्रिकेट हंगामात ऑस्ट्रेलिया दौरा करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच ऍशेस मालिकेचे वेळात्रक घोषित केले होते. पण आता त्यांनी २०२५-२६ हंगामात मायदेशात होणाऱ्या इतर मालिकांचेही वेळात्रक जाहीर केले, ज्यात भारताविरूद्धच्या सामन्यांचाही समावेश आहे.
याशिवाय ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धही मालिका खेळणार आहे. आगामी काळात ऑस्ट्रेलियन संघ पुढीलवर्षी होणाऱ्या टी२० वर्ल्ड कपच्या दृष्टीने टी२० सामन्यांवर या हंगामात लक्ष्य केंद्रित करताना दिसणार आहे. त्यामुळे ते पुढच्या वर्षी न्यूझीलंड आणि पाकिस्तान दौऱ्यावरही टी२० मालिकेसाठी जाणार आहेत.