
Shubman Gill Takes Over as ODI Captain for Australia Tour; Rohit Sharma Removed
ESAKAL
Rohit Sharma Out as ODI Skipper of INDIA : भारतीय संघ नवीन सुरुवात करताना पुन्हा एकदा दिसणार आहे. रोहित शर्माकडून कसोटी संघाचे कर्णधारपद शुभमन गिलकडे गेल्यानंतर, आता वन डे संघाचेही कर्णधारपद गेले आहे. भारत आणि ऑस्ट्रलिया यांच्यात १९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वन डे व ट्वेंटी-२० मालिकेसाठीचे संघ जाहीर केले गेले. रोहित व विराट कोहली यांच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या दोघांनी चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतर वन डे क्रिकेट खेळलेले नव्हते आणि इंग्लंड दौऱ्यापूर्वी त्यांनी कसोटीतून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे ते आता फक्त वन डे क्रिकेट खेळणार असल्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्यांची निवड होते की नाही याची सर्वांना उत्सुकता होती.