Ind vs Eng Test Cricket : भारतीय संघ बॅकफूटवर ; यशस्वी वगळता इतर फलंदाजांकडून निराशा

चौथ्या कसोटी सामन्यात कालच्या पहिल्या दिवशी पहिल्या सत्राचा अपवाद वगळता भारतीय संघ बॅकफूटवरच राहिला आहे.
Ind vs Eng Test Cricket
Ind vs Eng Test Cricketsakal

रांची : चौथ्या कसोटी सामन्यात कालच्या पहिल्या दिवशी पहिल्या सत्राचा अपवाद वगळता भारतीय संघ बॅकफूटवरच राहिला आहे. अगोदरच्या इंग्लंडने उभारलेल्या साडेतीनशे धावा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर झालेली ७ बाद २१९ अशी अवस्था भारतीय संघासाठी धोक्याची घंटा वाजवणारी ठरली आहे.

भरपूर चर्चेत आलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडने काल पहिल्या सत्रात पाच फलंदाज गमावले होते. त्यानंतर ज्यो रूटच्या शतकाच्या जोरावर त्यांनी ३५३ धावा केल्या. त्याच खेळपट्टीवर भारतीय फलंदाज अडखळत आहेत. यशस्वी जयस्वालच्या ७३ धावांचा अपवाद वगळता इतरांसाठी फलंदाजी कठीण वाटत होती. भारतीय संघ अजूनही १३४ धावांनी पिछाडीवर आहे.

भारतीय संघाच्या फलंदाजीची सुरुवात अत्यंत खराब झाली. अँडरसनने परत एकदा रोहित शर्माला जाळ्यात पकडले. एका बाजूने वेगवान गोलंदाजांना मारा करायला लावून बेन स्टोक्स याने दुसऱ्‍या बाजूने शोएब बशीरला गोलंदाजीला आणले. एव्हाना जयस्वाल खेळपट्टीवर जम बसवून सुंदर फलंदाजी करू लागला होता. थोडा वेळ घेऊन शुभमन गिलची नजर चेंडूवर स्थिरावली होती. दोन तरुण फलंदाज भारताला योग्य भागीदारी रचून देणार वाटत असताना गिलने बशीरच्या चेंडूवर गिल पायचित झाला. चौथ्या क्रमांकावर आलेल्या रजत पाटीदारवर प्रचंड दडपण होते. बऱ्‍यापैकी वळलेल्या चेंडूवर पाटीदार बशीरला पायचित झाला.

जडेजाने हार्टलीला दोन लांब षटकार मारून जडेजाने प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढवल्या. बशीरने अपेक्षा तोडताना जडेजाला बाद केले. सारी भिस्त जयस्वाल-सर्फराझ खान जोडीवर होती. जयस्वाल अर्धशतकानंतर अजून आत्मविश्वासाने खेळू लागला. त्यातून सर्फराझ खान एकदा धावचीत होताना वाचला. वाटले होते गेल्या सामन्याप्रमाणेच ही जोडी संघाला अडचणीतून बाहेर काढणार. बशीरने जयस्वालला आणि हार्टलीने सर्फराझला बाद करून आशांना धुळीत मिळवले.

तत्पूर्वी, रॉबीन्सनने अर्धशतक झळकावून सगळ्यांना चकित केले. दोघांची शतकी भागीदारी पार पडल्यावर भारतीय संघाच्या समस्या वाढू लागल्या. चांगला खेळत असलेल्या रॉबीन्सनने जडेजाला वाकड्या बॅटचा फटका मारायचा केलेला प्रयत्न फसला आणि जुरेलने चांगला झेल पकडला. त्यानंतर जडेजाने शोएब बशीर आणि अँडरसनला लगोलग बाद करून इंग्लंडचा डाव ३५३ धावांवर संपवला. ज्यो रूट १२२ धावांवर नाबाद परतला.

संक्षिप्त धावफलक :

इंग्लंड, पहिला डाव : ३५३ (झॅक क्रॉली ४२, ज्यो रूट १२२, बेन फोक्स् ४७, ऑली पोप ५८, सिराज १८-३-७८-२, आकाश दीप १९-०-८३-३, जडेजा ३२.५-७-६७-४, अश्विन २२-१-८३-१). भारत, पहिला डाव : ७ बाद २१९ (यशस्वी जयस्वाल ७३, रोहित शर्मा २, शुभमन गिल ३८, रजत पाटीदार १७, रवींद्र जडेजा १२, सर्फराझ खान १४, ध्रुव जुरेल खेळत आहे ३०, अश्विन १, कुलदीप यादव खेळत आहे १७, अँडरसन १२-४-३६-१, बशीर ३२-४-८४-४, हार्टली १९-५-४७-२.

खेळपट्टीची एक बाजू धोकादायक

खेळपट्टीच्या पॅव्हेलियन येथील बाजूने चेंडू अचानक खूप खाली राहायला लागल्याचा फटका दुसऱ्‍या डावात फलंदाजांना सहन करावा लागणार आहे. इंग्लंड फलंदाजीप्रमाणे भारताचे शेपूट किती काळ वळवळते यावरून पहिल्या डावात इंग्लंडला किती आघाडी मिळते हे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com