Asia Cup U19: भारताने दिलेली जखम पाकिस्तानच्या जिव्हारी! उपांत्य फेरीत न खेळताच जाणार घरी; बांगलादेश फायनलला पोहोचणार

Asia Cup U19 semifinal abandoned rules explained: आशिया कप १९ वर्षांखालील स्पर्धेत पाकिस्तानसाठी धक्कादायक वळण येण्याची शक्यता आहे. भारताने गटफेरीत दिलेली पराभवाची जखम आता पाकिस्तानच्या जिव्हारी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. पावसामुळे उपांत्य फेरीचा सामना रद्द झाल्यास पाकिस्तानला मैदानात उतरण्याची संधीही न मिळता स्पर्धेबाहेर जावे लागू शकते.
Pakistan will knocked out without playing semifinal Asia Cup U19:

Pakistan will knocked out without playing semifinal Asia Cup U19:

ESAKAL

Updated on

Pakistan will knocked out without playing semifinal Asia Cup U19: १९ वर्षांखालील मुलांसाठी आयोजित केलेल्या आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढती आज होणार आहेत. पण, भारतीय वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होणारे सामने आता १ वाजले तरी सुरू झालेले नाहीत. स्पर्धेत अपराजित असलेला भारतीय संघ उपांत्य फेरीत ब गटातून आलेल्या श्रीलंकेचा सामना करणार आहे. पाकिस्तानसमोर ब गटातील अव्वल बांगलादेशचे आव्हान आहे. पण, पावसाने दोन्ही लढतीत खोडा घातला आहे आणि पाकिस्तानच्या ताफ्यात भीती पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com