India likely playing XI for 1st T20I against England
esakal
India vs England first T20I predicted playing XI: भारतीय संघात बरेच मॅचविनर खेळाडू आहेत आणि त्यांच्यावर आमचा विश्वास आहे, कर्णधार श्रेयस अय्यरच्या या विधानाने इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील प्लेइंग इलेव्हनबाबत स्पष्टता आधीच मिळाली आहे. त्यामुळे १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला ( Vaibhav Sooryavanshi) पदार्पणाची संधी मिळेल, याची शक्यता कमीच आहे. भारत-इंग्लंड यांच्यातल्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. आयर्लंडकडून झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचा कमबॅकसाठीचा प्रयत्न असणार आहे, परंतु त्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदलही अपेक्षित आहे. मात्र, हे बदल फलंदाजीच्या क्रमवारीत असण्याची शक्यता कमीच आहे.