India’s likely squad for T20 World Cup 2026
esakal
India’s likely squad for T20 World Cup 2026: भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली पुढील वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृ्त्त्वाखाली टीम इंडियाने २०२४ मध्ये वर्ल्ड कप उंचावला होता आणि आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाला घरच्या मैदानावर हे जेतेपद कायम राखण्याचे आव्हान आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी येत्या शनिवारी निवड समितीची बैठक होणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या शेवटच्या ट्वेंटी-२० सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी ( २० डिसेंबर) ही बैठक होणार आहे.