Vaibhav Suryavanshi emerges as India’s most searched cricketer on Google in 2025.
esakal
Most searched cricketer in India 2025 Top 10 List : गुगलने गुरुवारी त्यांचा 'Year in Search 2025' अहवाल प्रसिद्ध केला. भारतातील 'ट्रेंडिंग' क्रिकेटपटूंच्या टॉप १० मध्ये रोहित शर्मा किंवा विराट कोहली दोघांनाही स्थान मिळाले नसल्याने सर्वांचा आश्चर्याचा धक्का बसला. या यादीत अव्वल स्थान १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने पटकावले आहे. गुगलच्या डेटानुसार , IPL मधील पंजाब किंग्जचा स्टार प्रियांश आर्य हा वैभवनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे , त्यानंतर अभिषेक शर्मा आणि शेख रशीद या युवा खेळाडूंचा क्रमांक लागतो.