IND vs WI, 4th T20I: वैभव सूर्यवंशीला मायदेशात भारतासाठी पदार्पणाची संधी मिळणार? 'त्या' पोस्टने चर्चेला उधाण; कशी असेल Playing XI?

India's Predicted Playing 11 vs West Indies 4th T20I: वैभव सूर्यवंशी अद्याप भारतासाठी मायदेशात खेळलेला नाही. पण त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध चौथ्या टी२० सामन्यात संधी मिळू शकते, अशी चर्चा त्याच्या एका पोस्टमुळे होत आहे. या सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते, जाणून घ्या.
Vaibhav Sooryavanshi | India vs West Indies

Vaibhav Sooryavanshi | India vs West Indies

Sakal

Updated on: 

India's Predicted Playing XI vs West Indies for 4th T20I: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात चौथा टी२० सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर बुधवारी (१४ ऑक्टोबर) खेळवला जाणार आहे.

हा सामना जिंकून भारतीय संघाला मालिका खिशात घालण्याची संधी आहे, तर वेस्ट इंडिजचा प्रयत्न मालिकेत बरोबरी करण्याचा असेल. पहिल्या तीन सामन्यानंतर भारतीय संघ मालिकेत २-१ अशा फरकाने आघाडीवर आहे.

पहिल्या तीन सामन्यातही धावांचा पाऊस पडला आहे. आता हैदराबादचं मैदानही लहान असल्याने तिथेही मोठ्या धावा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Vaibhav Sooryavanshi | India vs West Indies
IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com