India predicted playing XI vs Zimbabwe 1st T20I
esakal
Vaibhav Sooryavanshi returns against Zimbabwe: इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पदार्पणात वैभव सूर्यवंशीला काही खास कामगिरी करता आली नसली तरी तो झिम्बाब्वे दौऱ्यावर भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये परतरणार आहे. संघ व्यवस्थापन त्याला आणखी संधी देण्याच्या तयारीत आहे. या मालिकेसाठी संजू सॅमसनला विश्रांती दिली गेल्याने वैभवचे खेळणे निश्चित मानले जात आहे. इंग्लंड मालिकेत वैभवला तीन सामन्यांत १४, १३ व १५ धावा करता आल्या होत्या. त्यामुळे त्याला पाचव्या सामन्यात बाकावर बसवले गेले. पण, संजूच्या अनुपस्थितीत वैभवला झिम्बाब्वेविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळेल, हे निश्चित आहे. २३ जुलैला हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर IND vs ZIM पहिली ट्वेंटी-२० मॅच होणार आहे.