इंग्लंडविरुद्ध २-२ अशी मालिका बरोबरीत सुटल्याने भारत WTC टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
WTC मध्ये गुणांची गणना PCT (Points Percentage – मिळवलेले गुण / एकूण गुण) यावर आधारित असते.
भारतीय संघाची पुढची कसोटी मालिका वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर होणार आहे
How can India qualify for WTC 2025-27 Final after 2-2 draw vs England? : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या सामन्यात अविश्वसनीय विजय मिळवून मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. इंग्लंडला पाचव्या दिवशी विजयासाठी ३५ धावा हव्या होत्या आणि त्यांच्या हातात चार विकेट्स होत्या. तरीही मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा यांना इंग्लंडला धक्के दिले आणि ६ धावांनी हार मानण्यास भाग पाडले. भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३७५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ३६७ धावा करू शकला.