Rohmalia News : 3.2 ओव्हर, 0 धावा, 7 विकेट्स… 17 वर्षीय क्रिकेटपटूने पदार्पण सामन्यात केला कहर

Indonesia's Rohmalia News Marathi
Indonesia's Rohmalia News Marathisakal

इंडोनेशियाची ऑफ-स्पिनर रोहमालियाने बुधवारी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजीचा नवा विश्वविक्रम नोंदवला. बाली येथे झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यात तिने मंगोलियाविरुद्ध 3.2 षटकात 0 धावा देऊन 7 विकेट घेतले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यातच तिने ही कामगिरी केली.

Indonesia's Rohmalia News Marathi
RCB Playoff Scenario : RCB फॅनला १०० तोफांची सलामी! २ तास रिसर्च करून तयार केला IPL प्लेऑफचा रोडमॅप... समजून घ्या समीकरण

रोहमालियाच्या आधी नेदरलँड्सची वेगवान गोलंदाज फ्रेडरिक ओव्हरडाइकने 2021 टी-20 वर्ल्ड कप युरोप क्षेत्र पात्रता फेरीत फ्रान्सविरुद्ध 3 धावांत 7 विकेट घेतल्या होत्या. ओव्हरडाइकनंतर महिला टी-20 मध्ये एका सामन्यात सात विकेट घेणारी रोहमालिया तिसरी गोलंदाज आहे. या दोघींशिवाय अर्जेंटिनाच्या ॲलिसन स्टॉक्सने पेरूविरुद्ध 3 धावांत सात बळी घेतले आहेत.

Indonesia's Rohmalia News Marathi
Team India Squad T20 WC24 : टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघातून हार्दिक पांड्याला डच्चू? राहुल, सॅमसनसह 'या' खेळाडूंवर नजर

त्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, सलामीवीर नी पुटू आयु नंदा साक्रीनीच्या 61 धावांच्या जोरावर इंडोनेशियाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 151 धावा केल्या. प्रत्युत्तरात मंगोलियाचा संघ 24 धावांवर ऑलआऊट झाला. इंडोनेशियाने हा सामना 127 धावांनी जिंकला. रोहमालियाने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली आणि एकूण फक्त 20 चेंडू टाकले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com