India vs South Africa Women’s World Cup Final 2025
esakal
India Women vs South Africa Women Final Marathi Cricket News : भारतीय महिला संघाला ऐतिहासिक कामगिरी खुणावतेय. भारतीय महिला संघाने तिसऱ्यांदा वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी दोन्ही वेळेस भारताला अपयश आले होते, परंतु यंदा हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली पोरी इतिहास घडवण्यासाठी सज्ज आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर त्यांच्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा आव्हान असणार आहे.