Smriti Mandhana and Shafali Verma 100+ partnership in a Women's ODI World Cup final
esakal
India Women vs South Africa Women Final Marathi Cricket News : स्मृती मानधना ( Smriti Mandhana) आणि शफाली वर्मा यांनी भारतीय संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. प्रतिका रावलच्या दुखापतीमुळे भारतीय संघा परतलेल्या शफालीने मोक्याच्या सामन्यात अर्धशतक झळकावले. साडेतीन वर्षानंतरचे हे तिचे पहिले अर्शतक ठरले असले तरी ते खूप महत्त्वपूर्ण ठरले. स्मृतीची तिला साथ मिळाली आणि पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून दोघींनी मोठा विक्रम नावावर केला. तेच स्मृतीनेही मोठी झेप घेतली. तिने भारताची महान फलंदाज मिताली राज हिच्या नावावर असलेला विक्रम मोडला.