Ruturaj Gaikwad
esakal
ऋतुराज गायकवाडने दुलीप ट्रॉफी उपांत्य फेरीत मध्य विभागाविरुद्ध १८४ धावांची शानदार खेळी केली.
आयपीएलमध्ये दुखापतीनंतर त्याने बुची बाबू स्पर्धेत शतक झळकावून पुनरागमन केले होते.
तरीदेखील बीसीसीआयने जाहीर केलेल्या भारत अ संघात त्याचे नाव नसल्याने अनेकांना धक्का बसला.
Ruturaj Gaikwad not selected for India A : पाच महिन्यांपूर्वी कोपरा दुखावल्याने इंडियन प्रीमिअर लीगचा हंगाम अर्ध्यावर सोडलेल्या ऋतुराज गायकवाडने जबरदस्त पुनरागमन केले. त्याने बुची बाबू स्पर्धेत शतक झळकावले आणि त्यानंतर दोन दिवसांपूर्वी दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मध्य विभागाविरुद्ध १८४ धावांची शानदार खेळी केली. पण, काय उपयोग? बीसीसीआयने आज ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध होणाऱ्या दोन बहुदिवसीय सामन्यांसाठी भारत अ संघ जाहीर केला. त्यात ऋतुराजचे नाव नसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.