India-Pakistan Controversy: पाकिस्तानी आता आपसात भांडू लागले; अध्यक्ष मोहसिन नक्वीविरोधात दंड थोपटले, पाकडे घाबरलेत

PCB divided over India Pakistan match: भारत-पाकिस्तान क्रिकेट वाद आता पाकिस्तानमध्येच नव्या वळणावर पोहोचला आहे. ICC कडून कठोर परिणामांचा इशारा मिळाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात (PCB) उघड फूट पडल्याचं समोर आलं आहे. अध्यक्ष मोहसिन नक्वी भारताविरुद्ध सामना न खेळण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं जात असताना, PCB मधील अनेक सदस्य या निर्णयाला विरोध करत आहेत
India Pakistan cricket controversy latest update

India Pakistan cricket controversy latest update

esakal

Updated on

Internal conflict in Pakistan Cricket Board: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ( PCB ) केव्हाही यू टर्न घ्यावा लागू शकतो. बांगलादेशच्या समर्थनात उतरलेल्या पाकिस्तानने india vs pakistan लढतीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला. पण, हा निर्णय त्यांच्या अंगलट आल्याचे दिसतेय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने ( ICC )गंभीर परिणामांना सामोरे जा, असा इशारा दिल्यानंतर पीसीबीच्या अनेक सदस्यांमध्य घबराट पसरली आहे. त्यामुळे ते आता पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी ( Mohsin Naqvi ) यांच्याविरोधात बोलू लागले आहेत. त्यामुळे १५ फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान सामना होण्याची शक्यता आता बळावली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com