
आयपीएल २०२४ स्पर्धा संपल्यानंतर काही दिवसातच भारताचा आणि राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू रियान पराग वादात अडकला होता. खरंतर या आयपीएल हंगामात त्याने ५७३ ठोकल्याने तो चर्चेत होता. त्याच्यासाठी कारकिर्दीतील सर्वोत्तम आयपीएल हंगाम ठरला होता. मात्र, त्यानंतर काही दिवसातच तो त्याच्या यु्ट्यूबवरील हिस्ट्रीमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता.