
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील तिसरा सामना रविवारी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघात खेळवला जात आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे हा सामना होत आहे. या सामन्यात घरच्या मैदानावर खेळताना मुंबईने चेन्नईसमोर १५६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चेन्नईसाठी या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाज चमकले आहेत.
या सामन्यात चेन्नईचा युवा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला चेन्नईच्या गोलंदाजांनी न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला.