
सोमवारी (२४ मार्च) इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील चौथा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात विशाखापट्टणमला खेळवला जात आहे. या सामन्यात लखनौने दिल्लीसमोर विजयासाठी २१० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पण लखनौकडून वाईल्ड कार्ड एन्ट्री केलेल्या शार्दुल ठाकूरने सुरुवातीलाच दिल्लीला मोठे धक्के दिले.
या सामन्यात धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीकडून जॅक फ्रेझर-मॅकगर्क आणि फाफ डू प्लेसिस ही नवी सलामी जोडी मैदानात उतरली.