

Rajasthan Royals sale price ₹12000 crore full details
esakal
Who will buy Rajasthan Royals franchise? इंडियन प्रीमिअर लीगचे १९ वे पर्व जवळ आले असताना फ्रँचायझी विक्रीलाही जोर धरला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही फ्रँचायझी विक्रीला निघाल्याचे गुपित आता लपलेलं नाही. राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (RCB) या दोन फ्रँचायझींच्या मालकीमध्ये बदल होणार आहे. RCB च्या मालकी हस्तांतरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असताना, RR साठी आधीच किमान तिघांकडून बोली प्राप्त झाल्या असून, त्यात आदित्य बिर्ला ग्रुप आघाडीवर असल्याचे वृत्त समोर आले आहे.