Ajinkya Rahane strategizes as KKR bowlers restrict CSK despite early aggression.
esakal
Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Marathi Update: चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणखी एका सामन्यात अपयशाचा पाढा वाचला.. संजू सॅमसन व आयुष म्हात्रे यांनी कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला खरा, परंतु त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही. अजिंक्य रहाणेने कल्पन नेतृत्व दाखवताना फिरकीपटूंचा मारा सुरू करून CSK ची धावगती संथ केली आणि त्यामुळे दडपण वाढत गेले. सर्फराज खान व डेवॉल्ड ब्रेव्हिस या जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. मात्र, चेन्नईला अपेक्षित धावसंख्या उभारता आल्या नाहीत.