आयपीएल २०२६ लिलाव अबुधाबीमध्ये मंगळवारी पार पडला. या लिलावात ७७ खेळाडूंवर बोली लागली आणि २१५.४५ कोटी खर्च करण्यात आले. या लिलावानंतर सर्व १० संघांचा २५ खेळाडूंचा कोटा पूर्ण झाला आहे..इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचा लिलाव अबुधाबीमधील इतिहाद सेंटर येथे मंगळवारी (१६ डिसेंबर) पार पडला. एकूण ७७ जागांसाठी झालेल्या या लिलावात ३५९ खेळाडू रिंगणात होते. या लिलावातून सर्व फ्रँचायझींनी १९ व्या हंगामासाठी संघबांधणी केली आहे. या लिलावानंतर आता पुन्हा ट्रेडिंग विंडो सुरू होईल. त्यामुळे संघ खेळाडूंना ट्रेड करू शकतात. पण सध्यातरी सर्व फ्रँचायझींनी आपआपले संघ मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.आयपीएल २०२६ लिलावात अनेक चकीत करणारे निर्णयही पाहायला मिळाले. सुरुवातीलच ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन याच्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सने २५ कोटी रुपयांची बोली लावली. त्यामुळे तो आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. त्याने मिचेल स्टार्कचा २४.७५ कोटींची विक्रम मागे टाकला. इतकेच नाही, तर कोलकाताने मथिशा पाथिराना याच्यासाठीही १८ कोटींची बोली लावली..IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार.दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सने अनकॅप्ड खेळाडूंना अधिक पसंती दाखवली. त्यांनी कार्तिक शर्मा आणि प्रशांत वीर या दोन्ही युवा खेळाडूंसाठी प्रत्येकी १४.२० कोटींची बोली लावली. हे दोघेही आता सर्वात महागडे अनकॅप्ड खेळाडू ठरले आहेत. यापूर्वी हा विक्रम आवेश खानच्या नावावर होता. त्याला लखनौ सुपर जायंट्सने २०२२ लिलावात १० कोटींना खरेदी केले होते. कार्तिक आणि प्रशांत आयपीएल २०२६ लिलावातील सर्वात महागडे भारतीय खेळाडूही ठरले. आकिब दार या अनकॅप्ड खेळाडूसाठी दिल्ली कॅपिटल्सने ८.४० कोटी रुपये मोजले.आयपीएल २०२६ लिलावात केवळ पाच खेळाडूंना १० कोटींहून अधिकची बोली लागली. कॅमेरॉन ग्रीन, पाथिराना, कार्तिक आणि प्रशांत यांच्याशिवाय इंग्लंडचा अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोन याच्यासाठी सनरायझर्स हैदराबादने १३ कोटींची बोली लावली. यानंतर मुस्तफिजूर रहमानला कोलकाता नाईट रायडर्सने ९.२० कोटी रुपये मोजले.या लिलावात सर्वाधिक रक्कम जवळ असल्याने चेन्नई आणि कोलकाता सर्वाधिक सक्रिय दिसले. या संपूर्ण लिलावात २१५.४५ कोटी खर्च करण्यात आला आणि ७७ खेळाडूंवर बोली लागली. त्यामुळे आता सर्व संघात २५ खेळाडूंचा कोटा पूर्ण झाला आहे..आयपीएल २०२६ साठी सर्व संघ -मुंबई इंडियन्स - (उरलेली रक्कम - ५५ लाख)रिटेन केलेले खेळाडू - रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, रायन रिकल्टन, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटेनर, विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, शार्दुल ठाकूर, राज बावा, शेरफेन रुदरफोर्ड, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, दीपक चाहर, अश्विनी कुमार, रघू शर्मा, अल्हा गजहनफर, मयंक मार्कंडे.लिलावात खरेदी केलेले खेळाडू - क्विंटन डी कॉक (१ कोटी), मयंक रावत (३० लाख), अथर्व अंकोलेकर (३० लाख), मोहम्मद इझहार (३० लाख), दानिश मालेवार (३० लाख)चेन्नई सुपर किंग्स - (उरलेली रक्कम - २.४० कोटी)रिटेन केलेले खेळाडू - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेव्हिस, एमएस धोनी, उर्विल पटेल, संजू सॅमसन, शिवम दुबे, जॅमी ओव्हर्टन, रामकृष्ण घोष, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुर्जपनीत सिंग, नॅथन एलिस, श्रेयस गोपाळ, मुकेश चौधरी.लिलावात खरेदी केलेले खेळाडू - कार्तिक शर्मा (१४.२० कोटी), प्रशांत वीर (१४.२० कोटी), राहुल चाहर (५.२० कोटी), मॅट हेन्री (२ कोटी), अकिल हुसैन (२ कोटी), मॅथ्यू शॉर्ट (१.५० कोटी), झॅक फॉक्स (७५ लाख), सर्फराज खान (७५ लाख), अमन खान (४० लाख)..रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (उरलेली रक्कम - २५ लाख)रिटेन केलेले खेळाडू - रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जेकब बेथेल, जोश हेझलवूड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिक सलाम, अभिनंद शर्मा आणि अभिनंद शर्मा.लिलावात खरेदी केलेले खेळाडू - वेंकटेश अय्यर (७ कोटी), मंगेश यादव (५.२० कोटी), जेकॉब डफी (२ कोटी), जॉर्डन कॉक्स (७५ लाख), कनिष्क चौहान (३० लाख), विहान मल्होत्रा (३० लाख), विकी ओत्सवाल (३० लाख), सात्विक देसवाल (३० लाख)सनरायझर्स हैदराबाद - (उरलेली रक्कम - ५.४५ कोटी)रिटेन केलेले खेळाडू - पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, आर. स्मरण, इशान किशन, हेन्रिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कामिंडू मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडन कार्स, जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा, जीशान अन्सारी.लिलावात खरेदी केलेले खेळाडू - लियाम लिव्हिंगस्टोन (१३ कोटी), जॅक एडवर्ड्स (३ कोटी), सलील अरोरा (१.५० कोटी), शिवम मावी (७५ लाख), क्रेन्स फुलेत्रा (३० लाख), प्रफुल हिंगे (३० लाख), अमित कुमार (३० लाख), ओंकार टरमाळे (३० लाख), साकिब हुसैन (३० लाख), शिवांग कुमार (३० लाख).राजस्थान रॉयल्स - (उरलेली रक्कम - २.६५ कोटी)रिटेन केलेले खेळाडू - शुभम दुबे, वैभव सूर्यवंशी, कुणाल राठोड, लुआन-ड्रे प्रिटोरियस, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, युधवीर सिंग चरक, जोफ्रा आर्चर, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय सिंग, तुषार देशपांडे, फजलहक फारुकी, क्वेना मफाका, आशोक शर्मा, नांद्रे बर्गर, रवींद्र जडेजा, सॅम करन.लिलावात खरेदी केलेले खेळाडू - रवी बिश्नोई (७.२० कोटी), ऍडम मिलने (२.४० कोटी), रवी सिंग (९५ लाख), सुशांत मिश्रा (९० लाख), कुलदीप सेन (७५ लाख), ब्रिजेश शर्मा (३० लाख), अमन राल परला (३० लाख), विग्घ्नेश पाथुर (३० लाख), यश राज पुंजा (३० लाख)लखनौ सुपर जायंट्स (उरलेली रक्कम - ४.५५ कोटी)रिटेन केलेले खेळाडू - अब्दुल समद, आयुष बडोनी, एडन मार्कराम, मॅथ्यू ब्रेट्झके, हिम्मत सिंग, ऋषभ पंत (कर्णधार), निकोलस पूरन, मिशेल मार्श, शाहबाज अहमद, अर्शीन कुलकर्णी, मयंक यादव, आवेश खान, मोहसीन खान, मणिमरन सिद्धार्थ, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव, आकाश सिंह, मोहम्मद शमीलिलावात खरेदी केलेले खेळाडू - जॉश इंग्लिस (८.६० कोटी), मुकूल चौधरी (२.६० कोटी), अक्षत रघुवंशी (२.२० कोटी), एन्रिच नॉर्किया (२ कोटी), वानिंदू हसरंगा (२ कोटी), नमन तिवारी (१ कोटी)..कोलकाता नाईट रायडर्स - (उरलेली रक्कम - ४५ लाख)रिटेन केलेले खेळाडू - अजिंक्य रहाणे, सुनील नरेन, रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, मनीष पांडे, वरुण चक्रवर्ती, लवनीथ सिसोदिया, रहमानउल्ला गुरबाज, रमणदीप सिंग, अंकुल रॉय, रोवमन पॉवेल, हर्षित राणा, वैभव अरोरा, चेतन साकारिया, स्पेन्सर जॉन्सन.लिलावात खरेदी केलेले खेळाडू - कॅमेरॉन ग्रीन (२५.२० कोटी), मथिशा पाथिराना (१८ कोटी), मुस्तफिजूर रेहमान (९.२० कोटी), तेजस्वी सिंग (३ कोटी), रचिन रवींद्र (२ कोटी), फिन ऍलेन (२ कोटी), टीम सिफर्ट (१.५० कोटी), आकाश दीप (१ कोटी), राहुल त्रिपाठी (७५ लाख), दक्ष कमरा (३० लाख), सार्थक रंजन (३० लाख), प्रशांत सोळंकी (३० लाख), कार्तिक त्यागी (३० लाख)दिल्ली कॅपिटल्स (उरलेली रक्कम - ३५ लाख)रिटेन केलेले खेळाडू - अक्षर पटेल (कर्णधार), केएल राहुल, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, करुण नायर, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, विपराज निगम, माधव तिवारी, त्रिपुराणा विजय, अजय मंडल, कुलदीप यादव, मिचेल स्टार्क, टी. नटराजन, मुकेश कुमार, दुष्मंता चमिरा, नितीश राणा.लिलावात खरेदी केलेले खेळाडू - अकिब दार (८.४० कोटी), पाथम निसंका (४ कोटी), काईल जेमिसन (२ कोटी), लुंगी एनगिडी (२ कोटी), बेन डकेट (२ कोटी), डेव्हिड मिलर (२ कोटी), पृथ्वी शॉ (७५ लाख), साहिल पारेख (३० लाख).पंजाब किंग्स (उरलेली रक्कम - ३.५० कोटी)रिटेन केलेले खेळाडू - प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर, शशांक सिंग, नेहल वढेरा, मार्कस स्टोयनिस, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को यान्सिन, हरप्रीत ब्रार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुशीर खान, प्याला अविनाश, हरनूर पन्नू, सूर्यांश शेडगे, मिचेल ओवेन, झेव्हियर बार्टलेट, लॉकी फर्ग्युसन, वैशाख विजयकुमार, यश ठाकूर, विष्णू विनोद.लिलावात खरेदी केलेले खेळाडू - बेन ड्वारशुई (४.४० कोटी), कुपर कोनॉली (३ कोटी), विशाल निशाद (३० लाख), प्रवीण दुबे (३० लाख)गुजरात टायटन्स - (उरलेली रक्कम - १.९५ कोटी)रिटेन केलेले खेळाडू - शुभमन गिल (क), साई सुदर्शन, कुमार कुशाग्रा, अनुज रावत, जोस बटलर, निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, अर्शद खान, शाहरुख खान, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा, गुरनूर सिंग ब्रार, रशीद खान, मानव सुतार, साई किशोर, जयंत यादवलिलावात खरेदी केलेले खेळाडू - जेसन होल्डर (७ कोटी), टॉम बँटन (२ कोटी), अशोक शर्मा (९० लाख), लुक वूड (७५ लाख), पृथ्वीराज यारा (३० लाख).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.