Mumbai Indians bidding for Cameron Green till 2.40cr with 2.75cr purse
esakal
IPL 2026 Auction live Marathi News Updates: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठी ३६९ खेळाडूंची अंतिम यादी पटलावर ठेवली गेली होती आणि अबु धाबी येथे लिलाव सुरू आहे. आयपीएल २०२६ च्या या मिनी लिलावात कॅमेरून ग्रीन ( Camerone Green) या नावाने हवा केली आहे. IPL इतिहासातील तो सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. पृथ्वी शॉ व सर्फराज खान हे अनसोल्ड राहिले. पण, कॅमेरून ग्रीनसाठी मुंबई इंडियन्सने पहिली बोली लावली आणि सर्वांना आश्चर्य वाटले, कारण मुंबईच्या खात्यात २.७५ कोटीच होते. पण, चेन्नई सुपर किंग्सने या खेळाडूसाठी डाव साधला आणि कोलकाता नाइट रायडर्सचा खिसा रिकामी केला.