Prithvi Shaw finally finds a buyer as Delhi Capitals sign him for ₹75 lakh
esakal
IPL 2026 auction live Prithvi Shaw comeback story: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठीच्या लिलाव मंगळवारी अबु धाबी येथे पार पडला. एकूण ७७ जागांसाठी ३६९ खेळाडूंची नावे लिलावात आली होती. या ७७ खेळाडूंसाठी फ्रँचायझींनी मिळून २१५.४५ कोटी खर्च केले. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. कोलकाता नाइट रायडर्सने ( KKR ) त्याला २५.२० कोटींत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. या लिलावात सर्व फ्रँचायझींचा कल हा अनकॅप्ड भारतीय खेळाडूंकडे अधिक होता. त्यामुळेच बरेच स्टार खेळाडू अनसोल्ड राहिले. त्या यादीत पहिल्या दोन फेरीत पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याचेही नाव होते.