Delhi Capitals Sign Auqib Nabi for ₹8.40 Crore
esakal
IPL 2026 Auction live Marathi News Updates: कॅमेरून ग्रीन ( Cameron Green) २५.२० कोटींसह इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठीच्या लिलावात महागड्या खेळाडूचा मान पटकावला. आयपीएल इतिहासातील तो सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. त्यानंतर KKR ने आणखी एक मोठी खरेदी करताना श्रीलंकन गोलंदाज मथीशा पथिराणासाठी ( Matheesha Pathirana) १८ कोटी रुपये मोजले. भारतीयांमध्ये फिरकीपटू रवी बिश्नोई ७.२ कोटींत राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात गेला, तर वेंकटेश अय्यरसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ७ कोटींची यशस्वी बोली लावली.