Vaibhav Sooryavanshi Best Uncapped Playing XI of IPL 2026
esakal
Vaibhav Sooryavanshi opener in uncapped IPL team: इंडियन प्रीमियर लीगच्या २०२६ च्या चालू हंगामात, १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंग, अंगक्रिश रघुवंशी, प्रिन्स यादव आणि साकिब हुसेन यांच्यासह अनेक युवा नवोदित खेळाडूंनी आपल्या कामगिरीने प्रभावित केले आहे. आपापल्या संघांच्या यशात त्यांनी मोठा वाटा उचलला आहे. प्रिन्स यादवला अफगाणिस्तानविरुद्धच्या वन डे मालिकेत संधी मिळाली आहे, तर वैभवचा श्रीलंका दौऱ्यावरील भारत अ संघात समावेश केला गेला आहे. IPL 2026 चा अंतिम सामना आता फक्त तीन दिवसांवर आला असताना, अनकॅप्ड खेळाडूंच्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनची चर्चा रंगली आहे.