Avesh Khan under scrutiny after controversial moment during SRH vs LSG IPL 2026 clash
esakal
Over-Excitement Costs Avesh Khan? IPL 2026 Ban Threat Looms: लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज आवेश खान याच्यावर बंदी घातली जाण्याची चर्चा सुरू आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याच्याकडून ICC च्या नियमांचा भंग झाला आणि त्यामुळेच इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये त्याच्यावर बंदी घातली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. LSG कर्णधार रिषभ पंत याने मारलेला चेंडू सीमारेषेपार जाण्यापूर्वीच आवेशने बॅटने तो पुन्हा टोलवला. त्यानंतर लखनौने विजयी जल्लोष केला. पण, आवेशची ही कृती नियमाच्या कचाट्यात अडकली आहे.