Tristan Stubbs and Sameer Rizvi capitalise on CSK’s dropped catch to shift momentum in DC vs CSK clash
Delhi Capitals vs Chennai Super Kings Marathi Update : चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना दिल्ली कॅपिटल्सच्या धावगतीला चांगली लगाम लावली होती. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे. अशात CSK ने चांगला मारा केला, परंतु DC च्या त्रिस्तान स्तब्सचा झेल सोडणे त्यांना महागात पडले. स्तब्स आणि इम्पॅक्ट प्लेअर समीर रिझवी, या जोडीने CSK च्या मेहनतीवर पाणी फिरवले आणि सन्मानजनक लक्ष्य उभे केले.