DC vs PBKS: २६४ धावा करूनही दिल्ली हरले, पंजाब किंग्सने विजयासह T20 मध्ये इतिहास घडवला! श्रेयस अय्यरची सेना अपराजितच

Punjab Kings Beat Delhi Capitals: आयपीएल २०२६ स्पर्धेत पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केले. त्यांचा हा ऐतिहासिक विजय ठरला. टी२० मध्ये पंजाबने इतिहास घडवला आहे.
Prabhsimran Singh - Priyansh Arya | DC vs PBKS | IPL 2026

Prabhsimran Singh - Priyansh Arya | DC vs PBKS | IPL 2026

Sakal

Updated on

DC vs PBKS Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) पंजाब किंग्सने शनिवारी दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्याच घरच्या मैदानात अरुण जेटली स्टेडियममध्ये पराभवाचा धक्का दिला. पंजाबने ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. हा ७ सामन्यांतील ६ वा विजय आहे. त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे ते अद्यापही अपराजित आहेत. ७ सामन्यात अपराजित राहणारा त्यांचा पहिला संघ आहे.

या सामन्यात दिल्लीने पंजाबसमोर २६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग पंजाबने (Punjab Kings) १८.५ षटकातच पूर्ण केला. त्यामुळे त्यांनी इतिहास रचला आहे. आयपीएलच नाही, तर पुरुषांच्या टी२० क्रिकेटमध्ये यापूर्वी कधीही इतक्या मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग झालेला नव्हता.

त्यामुळे पंजाब किंग्स पुरुषांच्या टी२०क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग (Successful Run Chase in Men's T20) करणारा संघ ठरला आहे.

<div class="paragraphs"><p>Prabhsimran Singh - Priyansh Arya | DC vs PBKS | IPL 2026</p></div>
IPL 2026, RR vs SRH: सनरायझर्स हैदराबादने अचानक कर्णधार बदलला! नवा कॅप्टन टॉस जिंकून ईशान किशनबद्दल काय म्हणाला?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com