IPL 2026 Point Table: 'साई'कृपा! गुजरात टायटन्सचा शानदार विजय! चेन्नई सुपर किंग्सला नमवून गुणतालिकेत घेतली मोठी झेप...

IPL 2026 points table after CSK vs GT Match : आयपीएल २०२६ मध्ये गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सवर शानदार विजय मिळवत गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. गोलंदाजी व फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर गुजरातचा खेळ आज वरचढ राहिला.
Gujarat Titans defeated Chennai Super Kings in IPL 2026

Gujarat Titans defeated Chennai Super Kings in IPL 2026

esakal

Updated on

Chennai Super Kings vs Gujarat Titans Marathi Update: गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये रविवारी चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. ४ फलंदाज ३७ धावांवर गमावल्यानंतर ऋतुराज गायकवाडच्या नाबाद ७४ धावांनी CSK ला १५८ धावांपर्यंत पोहोचवले. पण, GT चे सलामीवीर शुभमन गिल व साई सुदर्शन यांनी आक्रमक सुरूवात करून दिली. साईने आपला फॉर्म कायम राखताना संघाचा विजय निश्चित केला आणि IPL 2026 Point Table मध्ये पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. CSK ची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com