

GT vs SRH | IPL 2026
Sakal
आयपीएलमध्ये प्लेऑफ निश्चित करण्याची लढाई हातघाईवर आलेली असताना प्रत्येकी १४ गुण असलेल्या परंतु अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्याच आज (१२ मे) सामना होत आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाचे प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित होईल.
१० पैकी पहिले चार संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवणार आहेत आणि ताज्या क्रमवारीनुसार बंगळूर, हैदराबाद, गुजरात आणि पंजाब हे संघ पहिल्या चार क्रमांकावर आहेत, परंतु एकाचेही प्लेऑफमधील स्थान निश्चित झालेले नाही. तरीही सर्वांचा प्रयत्न पहिल्या दोन स्थानांमध्ये रहाण्याचा असणार आहे. त्यामुळे उर्वरित लढती मग त्यात प्रतिस्पर्धी कोणीही असले तरी महत्त्वाच्या ठरणार आहेत.