

IPL 2026 | KKR vs DC
Sakal
IPL 2026, KKR vs DC Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होत आहे. ईडन गार्डन्सवर होत असलेला हा सामना दोन्ही संघांचा स्पर्धेतील शेवटचा सामना आहे. कारण दोन्ही संघांचे आव्हान आधीच संपले आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा आता विजयासह शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल.
या सामन्यात केएल राहुलने (KL Rahul) केलल्या आक्रमक अर्धशतकामुळे दिल्लीने कोलकातासमोर २०४ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले आहे.