

Rajasthan Royals | IPL 2026 | MI vs RR
Sakal
IPL 2026, MI vs RR Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील प्लेऑफमध्ये (Playoff) जाणारा चौथा संघ मिळाला आहे. राजस्थान रॉयल्सने या चौथ्या संघाचा मान मिळवला आहे. रविवारी (२४ मे) राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) अखेरच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) ३० धावांनी पराभूत केलं.
राजस्थान रॉयल्सने या विजयासह १६ गुण मिळवले आणि पाँइंट्स टेबलमध्ये चौथे स्थान मिळवले. त्यामुळे आता ते सनरायझर्स हैदराबादविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळणार हे निश्चित झाले आहे.
मात्र, राजस्थानच्या विजयामुळे पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचे स्वप्न तुटले आहे. या दोन्ही संघांच्या आशा मुंबई-राजस्थान सामन्यावर होत्या. हे दोन्ही संघ राजस्थान हरावी यासाठी आशा करत होते. पण राजस्थानने विजय मिळवल्याने या दोन्ही संघांचे आव्हान संपले. कारण हे दोन्ही संघ १६ गुणांपर्यंत पोहचू शकत नाहीत.