

KKR vs GT | IPL 2026
Sakal
IPL 2026, KKR vs GT Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत शनिवारी (१६ मे) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्सविरुद्ध सामना होणार आहे. हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानात ईडन गार्डन्सवर होणार आहे.
गुजरातने १६ गुण मिळवून प्लेऑफमधील स्थान जवळपास पक्के केले आहे. मात्र कोलकाताला स्पर्धेत कायम राहण्यासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. हा सामना पराभूत झाल्यास त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात येईल.