Mumbai Indians become the first IPL franchise to play 300 T20 matches
esakal
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Marathi Update: पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल २०२६ मध्ये क्रिकेटच्या इतिहासात एक नवीन सुवर्णाक्षरांनी लिहिलेला अध्याय जोडला आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३०० सामने खेळणारी मुंबई इंडियन्स ही जगातील पहिली आयपीएल फ्रँचायझी बनली आहे. या ऐतिहासिक टप्प्यामुळे मुंबई इंडियन्स आता पाकिस्तान राष्ट्रीय संघ आणि इंग्लंडच्या सॉमरसेट काउंटी क्रिकेट क्लबच्या जागतिक विक्रमाच्या अतिशय जवळ पोहोचली आहे.