IPL 2026, MI vs SRH: मुंबईच्या अस्तित्वाची लढाई; हैदराबादविरुद्ध आज सामना; कशी असेल संभावित प्लेइंग इलेव्हन

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad: कामगिरीत सुधारणा करण्याशिवाय पर्याय नसलेला मुंबई इंडियन्सचा संघ आज सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मैदानात उतरणार आहे. या सामन्यासाठी मुंबईच्या संघात बदल होण्याती शक्यता आहे.
MI vs SRH | IPL 2026

MI vs SRH | IPL 2026

Sakal

Updated on

IPL 2026 MI vs SRH, Marathi News: पाच वेळा आयपीएल जिंकण्याचा अनुभव पाठीशी असतानाही यंदा स्पर्धा अर्ध्यावर असतानाच अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना आज (२९ एप्रिल) फॉर्मात असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होत आहे. पाच दिवसांच्या ब्रेकनंतर मुंबईचा संघ कामगिरीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा करत आहे.

मुंबई इंडियन्सचे सात सामने झाले असून, सात सामने शिल्लक आहेत. दोनच विजय मिळवता आल्यामुळे चार गुणांसह नवव्या स्थानावर आहेत. प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल, तर पहिल्या चार संघात स्थान मिळवावे लागेल. हे कठीण असले तरी अशक्य नाही, पण त्यासाठी पराभूत मानसिकता दूर करून नव्या विचाराने खेळावे लागणार आहे.

एकापेक्षा एक सरस आणि टी-२० विश्वकरंडक विजेत्या संघातील अधिक खेळाडूंचा भरणा असलेला मुंबईचा संघ प्रत्यक्षात मात्र सर्व जण अपेक्षाभंग करत आहेत.

<div class="paragraphs"><p>MI vs SRH | IPL 2026</p></div>
IPL 2026 Point Table : पंजाब किंग्सची अपराजित मालिका खंडित! राजस्थान रॉयल्सचा दमदार विजय अन् गुणतालिकेत उलटफेर; वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल चमकले
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com