Mumbai Indians playoff scenario IPL 2026 eliminated details
esakal
Mumbai Indians playoff scenario IPL 2026 eliminated details: मुंबई इंडियन्सचे इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या पराभवाने त्यांच्या प्ले ऑफच्या आशांना सुरूंग लावला आहे. मुंबई इंडियन्सचा हा ९ सामन्यांतील सातवा पराभव ठरला आहे आणि आता उर्वरित पाच सामन्यांत विजय मिळवूनही ते १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. अशात सध्याच्या घडीतील अव्वल चार संघांची गुणसंख्या पाहिल्यास, ते सहज १४ च्या पुढे जातील. त्यामुळे MI चे आव्हान संपल्यात जमा झाले आहे. या पराभवामुळे हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वकौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.