

IPL 2026 Playoffs Race
Sakal
IPL 2026 Playoff Probabilities: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा आता (IPL 2026) शेवटच्या टप्प्याकडे झुकत आहे. या स्पर्धेत आता साखळी फेरी संपण्यासाठी आजा केवळ दोन आठवड्यांचा कालावधी राहिला आहे. प्रत्येक संघाचे शेवटचे ३-४ साखळी सामने बाकी आहेत. त्यामुळे प्लेऑफसाठीही शर्यत आणखी रंगतदार झाली आहे.
नुकतेच सोमवारी (११ मे) पंजाब किंग्सला (Punjab Kings) दिल्ली कॅपिटल्सने ३ विकेट्सने पराभूत करत आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. सुरुवात दणक्यात केलेल्या पंजाबचा मात्र हा सलग चौथा पराभव होता. त्यामुळे पहिल्या टप्प्यात दिसणारे चित्र आता दुसऱ्या टप्प्यात बरेच वेगळे दिसू लागले आहे.
पंजाब - दिल्ली यांच्यातील सामन्यानंतर आयपीएलचे अधिकृत ब्रॉडकास्टरने एक यादी जाहीर केली होती, ज्यात कोणत्या संघाला प्लेऑफची किती टक्के संधी आहे, याचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत.