CSK qualification scenario after defeat against SRH
esakal
Can CSK still qualify for IPL playoffs after SRH loss? चेन्नई सुपर किंग्सच्या इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का बसला. सोमवारी चेपॉकवर सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात यजमानांना दारूण पराभव पत्करावा लागला. CSK चा हा यंदाच्या पर्वातील घरच्या मैदानावरील शेवटचा सामना होता. SRH या विजयासह १६ गुणांसह प्ले ऑफमधील स्थान पक्के केले आणि सोबत गुजरात टायटन्सलाही घेऊन गेले. आता एका जागेसाठी ३ स्पर्धक आहेत आणि पराभवामुळे CSK चे गणित मात्र बिघडले आहे.