Lucknow Super Giants defeated Chennai Super Kings in a crucial IPL 2026 clash
esakal
How LSG defeat affected Chennai Super Kings playoff hopes? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या प्ले ऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर झालेल्या लखनौ सुपर जायंट्सने शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सच्या अडचणी वाढवल्या. या सामन्यापूर्वी १२ गुणांसह CSK चा संघ प्ले ऑफच्या शर्यतीत कायम होता, परंतु LSG कडून झालेल्या पराभवाने सर्व गणित बिघडले. आता चेन्नईला उर्वरित दोन सामन्यांत विजयासह इतरांच्या निकालावरही अवलंबून रहावे लागेल. दरम्यान, लखनौचा हा १२ सामन्यांतील चौथा विजय ठरला आणि त्यांनी मुंबई इंडियन्सला दहाव्या क्रमांकावर ढकलले.