

IPL 2026 Playoff Schedule
Sakal
IPL 2026 Playoff Schedule: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धत रविवारी (२४ मे) राजस्थान रॉयल्सने अखेरच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सला ३० धावांनी पराभूत केले. यासह राजस्थानने पाँइंट्स टेबलमध्ये १६ गुणांसह चौथा क्रमांक मिळवला आणि प्लेऑफची (Playoff) पात्रता मिळवली. त्यांच्या विजयासह प्लेऑफमध्ये पोहोचणारे चार संघ निश्चित झाले.
राजस्थानपूर्वीच (RR) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), गुजरात टायटन्स (GT) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते.