

Kolkata Knight Riders | IPL 2026 |
Sakal
IPL 2026 KKR Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटच्या दिवसापर्यंत चारही प्लेऑफमधील संघ अद्याप निश्चित झालेले नाहीत. अजूनही चौथ्या क्रमांकाच्या संघासाठी पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स शर्यतीत आहेत.
अशातच आता कोलकाता संघाचा निर्णायक सामना रविवारी (२४ मे) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. या आयपीएल २०२६ स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना आहे. या सामन्यापूर्वी कोलकाताला मोठा धक्का बसला.