IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

IPL 2026 points table latest Gujarat Titans playoff chances: गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना केवळ निकालासाठी नव्हे, तर वाद आणि नाट्यामुळेही चर्चेत राहिला. रजत पाटीदार याची वादग्रस्त विकेट आणि विराट कोहली याची आक्रमक प्रतिक्रिया यामुळे सामन्याला वेगळेच वळण मिळाले.
IPL 2026 POINTS TABLE GT BEAT RCB TO KEEP PLAYOFF HOPES ALIVE

IPL 2026 POINTS TABLE GT BEAT RCB TO KEEP PLAYOFF HOPES ALIVE

esakal

Updated on

Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru Marathi Update : रजत पाटीदारची वादग्रस्त विकेट... विराट कोहलीने घातलेला वाद अन् त्यानंतर त्याचा मैदानावरील धिंगाणा... रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातल्या सामन्यात चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचेल, असे बरेच प्रसंग घडलेले दिसले. RCB चा संपूर्ण संघ १५५ धावांवर तंबूत परतल्यानंतर GT हे लक्ष्य सहज पार करेल, असे वाटले होते. पण, भुवनेश्वर कुमार व रोमारिओ शेफर्ड यांनी उल्लेखनीय मारा करताना सामन्यातील चुरस कायम ठेवली होती. मात्र, गुजरातने हा सामना जिंकून प्ले ऑफची शर्यत चुरशीची केली. IPL 2026 Point Table मध्ये ते १० गुणांसह पाचव्या स्थानावर कायम राहिले असले तरी अंतिम ४ साठी त्यांनीही दावा ठोकला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com