KOLKATA KNIGHT RIDERS KEEP IPL 2026 PLAYOFF HOPES ALIVE
esakal
Kolkata Knight Riders playoff chances IPL 2026 Marathi Cricket News : कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये विजयाचा चौकार मारला. शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना त्यांनी सहज जिंकला आणि प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले. KKR ने या विजयासह IPL 2026 Point Table मध्ये १० सामन्यांत ९ गुणांची कमाई करून सातव्या स्थानावर कूच केली. DC चा हा ११ सामन्यांतील सातवा पराभव ठरला आणि आता उर्वरित तीन सामने जिंकूनही ते १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतील. अशात मुंबई इंडियन्स, लखनौ सुपर जायंट्स यांच्याप्रमाणे DC चेही प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे आव्हान संपल्यात जमा झाले आहे.