IPL 2026 Point Table: उर्विल पटेलची ऐतिहासिक खेळी! CSK ची मोठी झेप अन् लखनौ सुपर जायंट्स प्ले ऑफच्या शर्यतीतून OUT

IPL 2026 points table after CSK vs LSG Marathi Cricket News : चेन्नई सुपर किंग्सच्या युवा फलंदाज उर्विल पटेलने चेपॉकच्या मैदानावर धडाकेबाज खेळी करत लखनौ सुपर जायंट्सचे प्ले ऑफचे स्वप्न उद्ध्वस्त केले. आयपीएल २०२६ मधील महत्त्वाच्या सामन्यात उर्विलने अवघ्या २३ चेंडूंमध्ये ६५ धावांची तुफानी खेळी साकारली.
Chennai Super Kings beat Lucknow Super Giants

Chennai Super Kings beat Lucknow Super Giants

esakal

Updated on

Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Marathi Cricket Update: चेन्नई सुपर किंग्सच्या उर्विल पटेलने ( Urvil Patel) चेपॉकचे मैदान दणाणून सोडले. त्याने ८ षटकार व २ चौकारांसह २३ चेंडूंत ६५ धावांची विक्रमी खेळई करताना लखनौ सुपर जायंट्सला गुडघे टेकण्यास भाग पाडले. चेन्नईने या विजयासह IPL 2026 Point Table मध्ये आगेकूच केली आणि LSG ला स्पर्धेबाहेर फेकले. CSK १२ गुणांसह पाचव्या क्रमांकावर सरकले आहेत आणि त्यांनी राजस्थान रॉयल्सला मागे टाकले आहे. तेच LSG चा हा ११ सामन्यांतील ८वा पराभव ठरला आणि त्यांचे प्ले ऑफचे स्वप्न धुळीस मिळाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com