

IPL 2026 Qualifier 1 Date and Time
Sakal
RCB vs GT, IPL 2026, Qualifier 1: शुक्रवारी (२२ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ५५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. हा दोन्ही संघाचा अखेरचा साखळी सामना होता. पण या सामन्यात जरी बंगळुरूने पराभव स्वीकारला असला, तरी चांगल्या नेट रन रेटमुळे अव्वल क्रमांक कायम राखला.
सध्या पाँइंट्स टेबलमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर असलेल्या बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या तिन्ही संघांनी १४ सामन्यांपैकी ९ विजयांसह १८ गुण मिळवले आहेत.
मात्र नेट रन रेटच्या फरकामुळे बंगळुरू (०.७८३) पहिल्या, गुजरात (०.६९५) दुसऱ्या आणि हैदराबाद (०.५२४) तिसऱ्या क्रमांकावर आहे. यामुळे आता हे निश्चित झाले आहे की बंगळुरू आणि गुजरात पहिला क्वालिफायर सामना खेळणार आहेत, तर हैदराबादला एलिमिनेटर सामना खेळावा लागणार आहे.