

IPL 2026 Playoff Scenarios:
Sakal
इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) शुक्रवारी (२२ मे) सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ५५ धाावंनी पराभूत केले. या सामन्यानंतर आता पाँइंट्स टेबलमधील पहिले तीन क्रमांक निश्चित झाले आहेत. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या तिन्ही संघांनी प्लेऑफची पात्रता मिळावली आहे.
तसेच या तिन्ही संघांचे साखळी फेरीतील सामने पूर्ण झाले असून तिन्ही संघांचे गुण १८ आहेत. मात्र नेट रन रेटच्या फरकांमुळे बंगळुरू, गुजरात आणि हैदराबाद अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे हे निश्चित झाले आहे की बंगळुरू आणि गुजरात संघात पहिला क्वालिफायर सामना खेळला जाईल, तर हैदराबाद एलिमिनेटर (Eliminator) सामना खेळेल.
मात्र अद्याप प्लेऑफमध्ये जाण्यासाठी चौथा संघ निश्चित झालेला नाही, या चौथ्या क्रमांकाच्या संघासाठी सध्या ४ संघ शर्यतीत आहेत. यात राजस्थान रॉयल्स (RR), पंजाब किंग्स (PBKS), कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) हे संघ शर्यतीत आहेत. यातील जो संघ प्लेऑफमध्ये पोहचणारा चौथा संघ ठरेल, तो सनरायझर्स हैदराबादविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळणार आहे.